वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या तक्रारीची घेतली दखल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये लाखोंचा आर्थिक घोटाळा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी या वैद्यकीय महाविद्यालयाचा वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे याने तब्बल 3 लाख 70 हजार 350 रुपयांचा अपहार केला असून विद्यार्थ्यांची ही रक्कम त्याने स्वतःच्या खात्यावर घेतली असल्याची तक्रार ओरोस पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा आर्थिक अपहार मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी बाहेर काढला होता.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यापीठ शुल्क व अनामात रक्कम स्वीकारताना वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे यांने शासन खात्यात न भरता आपल्या वैयक्तिक खात्यात भरून घेतली. तसेच काही विद्यार्थ्याकडून अतिरिक्त रक्कम ही वसूल केली. याबाबत मनसेचे माजी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पुराव्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. आयुक्त वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभागाकडून याप्रकरणी प्राथमिक चौकशी झाली. आरोग्य संचालकांनी सदर वरिष्ठ लिपिकाविरुद्ध फौजदारी कारवाई करावी असे आदेश दिले होते. वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गचे अधिष्ठाता प्रकाश दत्तात्रय गुरव 25 जानेवारी 2022 रोजी पोरस पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम पुसांडे यांच्याविरोधात प्रिया दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी भादवी 409 व भादंवि 420 खाली गुन्हा दाखल केला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांचे पैसे घेताना हा घोटाळा झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार समोर आला होता.
1 सप्टेंबर 2020 ते 6 आक्टोंबर 2022 या कालावधीत हा 3 लाख 70 हजार 350 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रकाश दत्तात्रय गुरव यांनी पोलीस ठाण्यात विचार फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार, या गुन्ह्याचा तपास आता ओरोस पोलीस ठाणे करणार आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी

error: Content is protected !!