जानवली व कणकवली मधील सेतू ठरणाऱ्या “शरद बंधाऱ्या” चे काम पूर्ण
राष्ट्रवादी नेते नगरसेवक नाईक यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण उपक्रम
कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी देखील पाठपुरावा सुरू
कणकवली : राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील जानवली नदी गणपती साना येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ‘शरद बंधारा ‘ साकार केला. जानवली व कणकवली नदीवर दोन्ही गाव जोडणारा सेतू असलेला हा बंधारा गेली अनेक वर्ष साकारला जात आहे. नऊ दिवसांमध्ये गेली 15 वर्ष पाणी साठवणुकीसाठी व लोकांना येण्या जाण्या बंधारा बांधून सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्याचप्रमाणे ह्या वर्षी आज अबिद नाईक यांनी लोकांसाठी स्वखर्चातून बंधारा बांधण्याचे काम चालू केले आहे.
बंधारा बांधल्यामुळे जानवली गावाला व कणकवली शहराला खुप फायदा होतो जानवली मधील नळ योजनेची विहिर नदीलगत असल्यामुळे विहिरिची पाण्याची पातळी वाढते व जानवली गावाला पाण्याची टंचाई पाऊस पड़े पर्यंत भासत नाही अशी माहिती श्री नाईक यांनी दिली. त्याचबरोबर कणकवली शहरातील विहिरिची पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे शहरातील पाणी तूटवडा भासत नाही. त्याचबरोबर लोकाना जा- येण्या साठी या बंधाऱ्याचा खुप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
बंधाऱ्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतीला मुबलक पाणी मिळते. ह्या सर्व गोष्टीमुळे लोकांची अबिद नाईक यांच्या कड़े बंधारा बांधण्याची मागणी असते. व हि मागणी अबिद नाईक दरवार्षि पूर्ण करतात. त्याचबरोबर पक्का ब्रिज कम बंधारा होण्यासाठी शासन
स्तरावर अबिद नाईक यांनी प्रयत्न केले आहेत.असे अबिद नाईक यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित सर्व लोकांनी अबिद नाईक यांच्या समाज बांधीलकी व कार्याबद्द्ल समाधान व्यक्त केले. व नाईक यांचे आभार मानले.
बंधारा बांधतेवेळी जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे,ग्रामपंचायत सदयस्य दामोदर सावंत,रमेश राणे, नितिन राणे, अनुष्का राणे, दिशा राणे, सुवर्ना मेस्त्री, ग्रामस्थ दिपक दळवी उदय राणे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,शहर सरचिटणीस अनीस नाईक,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटनीस गणेश चौगुले, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली