कणकवली वासीयांयांच्या सेवेत “वॉटर एटीएम” रुजू

कणकवली तहसीलदार व नगराध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन

रोटरी क्लब कणकवली व तहसीलदार कार्यालयाच्या वतीने उपक्रम

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एक रूपया मध्ये एक लिटर पाणी हि संकल्पना पाण्याची ए.टी.एम्. मशीन बसवून प्रत्यक्षात साकार केली आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सर्वसामान्य जनतेच्या हे वॉटर एटीएम आजपासून सेवेत रुजू झाले आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट च्या माध्यमातून आणि रोटरी क्लब कणकवली सदस्यांच्या माध्यमातून निधी जमा करत जवळपास साडेतीन लाखांच्या या योजनेचा लोकार्पण सोहळा आज कणकवली तहसीलदार कार्यालय येथे पार पडला. कणकवली शहरातील नागरिक आणि कामाच्या निमित्ताने तहसीलदार कचेरीमध्ये येणाऱ्या नागरिकांना सहज, स्वच्छ आणि तहान भागेल एवढे एक लिटर पाणी एक रूपयात मिळून देण्यासाठी डॉ. विद्याधर तायशेटे, रोटरी अध्यक्ष २१-२२ प्रयत्नशील होते. त्यांनी हि संकल्पना रोटरी परिवार आणि नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या कडे बोलून दाखवली होती. सर्वांनी दातृत्वाची भूमिका घेत ही योजना तहसीलदार कार्यालयाच्या आवारात करण्याचे ठरवले. तहसीलदार आर्.जे. पवार यांनी या लोकाभिमुख योजनेला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर , तसेच डिस्ट्रिक्ट निधी मंजूर झाल्यानंतर आज या योजनेचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, नगराध्यक्ष समिर नलावडे आणि तहसीलदार आर्. जे. पवार यांच्या हस्ते पार पडला. कै. रो. रविद्रनाथ मुसळे हे सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांनी हि योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले होते. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. परंतु त्यांचे अर्धवट राहिलेले काम पुर्ण करून त्यांच्या स्मरणार्थ हि योजना लोकांना समर्पित केल्याची भावना प्रत्येक रोटरीयनच्या मनात होती. मान्यवरांनी आपल्या शुभेच्छापर संभाषणात रोटरी क्लब कणकवलीचे कौतुक केले. आणि पुढे होणाऱ्या प्रत्येक समाजपयोगी उपक्रमाला आपण सढळ हस्ते मदत करण्याचे अभिवचन दिले आहे.
या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रोटरी अध्यक्ष वर्षा बांदेकर, रो. डॉ. विद्याधर तायशेटे, रो.ॲड. दिपक अंधारी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. राजेश साळगांवकर गोवा , रो.असिस्टंट गव्हर्नर रो. दीपक बेलवलकर, रो. शशिकांत चव्हाण,कुडाळ, रो.राजेश कदम, रो. नितीन बांदेकर, रो. उमा परब, रो. रवि परब, रो. बेहरामजी राठोड, रो. रमेश मालविया, रो. डॉ. अमेय मराठे, रो.महेंद्र मुरकर,रो. माधवी मुरकर, रो. धनंजय कसवणकर, रो. अनिल कर्पे, रो.दादा कुडतरकर, रो.विरेंद्र नाचणे, रो. डॉ. सुहास पावसकर,रो.राजश्री रावराणे, रो. सोनू मालविया, रो. तृप्ती कांबळे,रो. लवू पिळणकर, रो. दिशा अंधारी, रो. मेघा गांगण ,रो. राजन बोभाटे कुडाळ अशोक मंडळ अधिकारी दिलीप पाटील, कर्मचारी वृंद,आणि नागरिक उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!