कुडाळ हायस्कूलमध्ये एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : क म शि प्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये स्काऊट गाईडचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळीच स्काऊट गाईडच्या ध्वजारोहणाचे शिबिराची सुरुवात झाली . यावेळी स्काऊटर कुणाल उमेश धरणे याच्या हस्ते ध्वजारोहण तर संघनायक विष्णू रितेश वालावलकर याच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक राजकिशोर हावळ, विभाग प्रमुख अनिल पोवार, एकनाथ जाधव, सुरेंद्र गोसावी, आनंद मर्गज, बाळकृष्ण तुळसकर, आत्माराम पोटे, गाईड विभागाच्या सुवर्णा नवार, शलाका गंगावणे, प्राजक्ता ठाकूर, शिल्पा परब, प्रियांका आंधळे, नेहा कांदळगावकर, ज्योती ठाकूर, विजय मयेकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी हावळ, गोसावी यांनी मार्गदर्शन केले. सौमित्र मुंडले, हर्ष परब या विद्यार्थ्यांनीन आपले मनोगत व्यक्त केले .

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अगदी न्याहारी पासून भोजनापर्यंत सर्व घटक स्वतः बनविले. यासाठीची पूर्वतयारी स्वतःच केली. त्यामुळे मुलांना प्रात्यक्षिक दिनक्रमाचा अनुभव घेता आला. यावेळी मुख्याध्यापक दादा शिरहट्टी, पत्रकार प्रमोद ठाकूर, माजी मुख्याध्यापक आनंद जामसंडेकर, मंगेश राऊत यांनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. याप्रसंगी उभारलेला स्काऊट गाईड तंबू सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. निसर्गाच्या सानिध्यात कसे जगावे याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण मुलांना मिळाले. नेतृत्व , नियोजन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे, स्वयंपाक बनविणे, सरपण गोळा करणे, एकमेकांना मदत करणे, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, स्वयंशिस्त, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे शिल्लक राहिलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचविणे यासारख्या अनेक गोष्टींचा अनुभव मुलांनी घेतला.
संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, सरकार्यवाह आनंद वैद्य, सहकार्यवाह सुरेश चव्हाण, सीईओ अरविंद शिरसाट, का . आ . सामंत, केदार सामंत , मुख्याध्यापक दादा शिरहट्टी उपमुख्याध्यापक दिनेश आजगावकर, पर्यवेक्षक महेश ठाकूर, आनंदा गावडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी प्रत्यक्ष भेटून आणि मुलांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेत मुलांना शुभेच्छा दिल्या त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.