कनेडी राड्या मधील १० आरोपींना पोलीस कोठडी

३०७ मधील सहा संशयीतांना दोन दिवस, तर ३५३ मधील चार संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी

अन्य संशयित देखील पोलिसांच्या रडावर

कणकवली : कणकवली तालुक्यात कनेडी येथे झालेल्या राड्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तब्बल 10 संशयित आरोपींना पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केल्यानंतर या संशयितांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. कलम 307 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीं कुणाल सावंत, मंगेश सावंत, योगेश वाळके, तर कलम 307 नुसार दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात श्रीकांत सावंत, राजेश पवार व निखिल आचरेकर यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तर 353 नुसार पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अटकेत असलेल्या संशयितांमध्ये अनिल पांगम, संतोष आंग्रे व संदीप गावकर व तुषार गावकर यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. नितीन कुंटे यांनी काम पाहिले. या गुन्ह्यांच्या तपासा कमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, श्रीमती. बगडे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्याकडून तपास काम सुरू करण्यात आले आहे. या गुन्ह्यांमधील अन्य संशयित देखील पोलिसांच्या रडारवर आहेत.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!