सावडाव मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

सावडाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी

कणकवली : सावडाव खलांत्रीवाडी येथील अनंत महादेव शिरवडकर यांची पाडी बिबट्याच्या हल्ल्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्युमुखी पडली. बिबट्याने या पाडीच्या गळ्याचा चावा घेतला. यात ती जागीच ठार झाली. दरम्यान बिबट्याच्या उपद्रवाने सावडाव परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात वनपाल अनिल जाधव व शेगावे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!