आंबोली घाटात मृतदेह टाकण्याचे प्रमाण का वाढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येईपर्यंत पोलीस चौकी असताना पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कोणते चेकिग करतात
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर याचा सवाल

‘ब्रेक अप ‘ केल्याच्या रागातून प्रियकराकडून प्रेयसीचा ‘निर्घूण खून आंबोली घाटात टाकला मृतदेह टाकण्याचा घडला प्रकार

सावंतवाडी

खून करून आंबोली घाटात मृतदेह टाकणे हे जणू आता नित्याचेच झाले आहे. जिल्यातील पोलीस यंत्रणा काय काम करते. आंबोली ठिकाणि जातांना तीन तीन पोलिस चौकी असताना येतील पोलीस गाड्या कोणत्या चेक करतात गोवा येतुन मृतदेह आणून जिल्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणि आणून टाकला जातो ही गंभीर बाब आहे. त्यामुळें यांची चौकशी होणे गरजेचे आहे. असे मत सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मत व्यक्त केलं आहे.

या प्रकारामुळे आंबोली सारखे पर्यटन स्थळ बदनाम होऊ लागले आहे.पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाक्षी शंकर उड्डापनोव (२८) या स्वतःच्याच प्रियसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात शुक्रवारी उघड झाला. प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव असून यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे असून निरूपदी कड (२२) नामक साथीदारालाही आंबोली येथे आणण्यात आले होते. संशयित आरोपीने पोलिस तपासात दिलेल्या माहितीनंतर गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोहोचले त्यानंतर संशयितांनी मृतदेह टाकल्याची जागा दाखविली तेथे शोध घेतल्यानतर त्यांना तो मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमच्या सहकार्याने ७० फूट खोल दरीतून सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

error: Content is protected !!