पाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय पाट, कै सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय तथा कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी जयवंत सुधीर कुडव, यश प्रशांत चव्हाण, तेजस्वी संजय मेस्त्री, सोहनी संदीप साळसकर, वैष्णव तानाजी काळे, प्रज्योत विजय मेस्त्री, भक्ती प्रवीण वारंग, वेदश्री श्रीपाद ठाकूर, रसिका लक्ष्मण झाड, दीपश्री संदीप परब, योगिता देवदास कुंभार, धनश्री शशिकांत पाटकर, विनायक संजय वेंगुर्लेकर, प्राजक्ता विजय मालणकर, पुष्पराज चंद्रकांत परब ,भार्गवी प्रदीप पाटकर, दिनेश शैलेश मयेकर ,साक्षी घनश्याम , यश वैभव मांजरेकर, मयूर महेश परब ,कृष्णा शंकर घाडी.
एच एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तृषा सचिन वारंग, ज्ञानेश अविनाश रावले, मानसी पांडुरंग मांजरेकर, समीक्षा राजेंद्र , प्रणया प्रकाश केरकर, चिन्मयी वैभव तांडेल.
माध्यमिक विद्यालय नेरुर माड्याचीवाडी मधील एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तन्वी उत्तम परब ,महादेव रामकृष्ण गडकरी ,विनोद मुकुंद राऊळ ,हर्षद विजय , विराज मंगेश गावडे.
इयत्ता पाचवी ते बारावी मधील विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थी श्राव्या रोशन माधव , मीरा महादेव सावंत, आर्यन अनिल परब, स्पृहा संदेश नाईक, भक्ती योगेश तेलीकोचरेकर, प्रणाली रवींद्र ठुंबरे, धनिशा निलेश परब ,मिहीर विजय मेस्त्री, कस्तुरी संतोष खानोलकर , दुर्वेश सुमंत सावंत ,महेश्वरी गिरी प्रसाद राऊळ, हर्षदा गणेश जोशी ,वैभवी सहदेव प्रभू, उत्कर्षा प्रवीण केरकर ,तन्वी नंदू गावडे ,अनन्या श्रीकृष्ण ठाकूर, गायत्री दत्तप्रसाद सामंत, दिशा श्रीकृष्ण सामंत , धनदा वैभव सावंत ,कोमल पंढरी कुडव, कस्तुरी संतोष खानोलकर, आर्या नारायण , देवांशी सचिन परब ,किमया शिवा नाईक, विघ्नेश प्रमोद परब ,विराज मंगेश परब , दुर्वेश हेमंत म्हापणकर,
वैदेही मंगेश अवसरे ,तन्वी प्रशांत गोसावी, आर्यन एकनाथ खोबरेकर, भार्गव शंकर पेडणेकर (आदर्श विद्यार्थी) वीरा वरद रेवंडकर , दुर्वा दत्तात्रय म्हैसकर, वेदिका सतीश नार्वेकर या सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत ,सचिव विजय ठाकूर ,मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक, ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर, ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत , जानव्ही पडते, दिनेश परब, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक तुषार आंबेरकर, सुधीर देसाई ,पूर्वा नाईक, शीला सामंत ,शिक्षकेतर प्रतिनिधी विलास घारे यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली.
विविध दात्यांनी संस्थेकडे ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून एकूण एक लाखापेक्षा जास्त बक्षीसे विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात नव्या उमेदीने अभ्यास करा. नवनवीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त बक्षीसे मिळवा असे आवाहन संस्था अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले. जास्तीत जास्त पारितोषिके मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करा असा मौलिक संदेश संस्था सचिव विजय ठाकूर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये दात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर , सूत्रसंचालन सिद्धी गणेश चव्हाण, पारितोषिकांचे वाचन संदीप साळसकर, शीला सामंत व आभार प्रदर्शन प्रशालेच्या पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी, विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!