उष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

२९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत उष्णतेचा प्रचंड वाढलेला तडाखा जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उघड्या उन्हात बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेमुळे चक्कर येणे, घुसमटल्यासारखे वाटणे किंवा अचानक तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरात हवा खेळती राहण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. तसेच मोबाईलचा वापर कमी करा, कारण उष्णतेमुळे मोबाईल गरम होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. जास्तीत जास्त थंड पेये जसे की ताक, दही, बेलफळाचा रस यांचा आहारात समावेश करावा. कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा… आणि सावध राहा!

error: Content is protected !!