महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दीप-मशालोत्सवाने उजळला रामगडपताका,शिवरायांचा जयघोष , रांगोळीचा सडा, माड आणि केळींमुळे आलेला पारंपारिक साज, झेंडूच्या फुलांनी सजलेला गडाचा प्रत्येक तट-बुरुज, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी जय शिवराय’ चा जयघोष, पूजा-आरती मुळे तयार झालेलं भक्तीमय वातावरण आणि पणत्यांच्या आणि मशालींच्या तेजोमय प्रकाशात न्हावून निघालेला रामगड यामुळे महाराष्ट्र दिन सोहळा रामगड किल्ल्यावर चैतन्य मय झाला. दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्या सहकार्याने किल्ले रामगडावर मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात हा महाराष्ट्र दिन साजरा केला गेला ..
२०१५ साली दुर्गवीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या किल्ल्याच्या संवर्धनाची सुरूवात झाली होती. तेव्हापासून हा गड सतत संवर्धनाच्या माध्यमातून उजळविण्याचा प्रयत्न दुर्गवीर प्रतिष्ठान करत आहेत. पारंपरिक सण-उत्सव गडावर आयोजित करून गड जागता ठेवण्यासाठी दुर्गवीर प्रयत्नशील आहेत. आज अनेक हात या कार्यात जोडले गेले आणि कामाला एक गती मिळाली आहे. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम गडपूजन त्यानंतर झेंडा पूजन झालं त्यानंतर गडावरील प्रमुख आकर्षण गडावरील 7 तोफात्यांचं पूजन झालं रामगड सरपंच शुभम मठकर यांच्या हस्ते गणेशाचे तर भालचंद्र पवार यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले.दुर्गवीर प्रतिष्ठाचे मिलिंद चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतरमंत्रोच्चार, आरती, गारद,घोषणा यामुळे भक्तीमय वातावरण तयार झालं होतं. छोटी आर्या विचारे हिने दिलेली गारद प्रत्येकाच्या मनात घर करून गेली.त्यानंतर मशाल प्रज्वलित करत दुर्गवीरांनी गडफेरी गणेश मंदिरातुन निघून तटबंदी वरून जाऊन मुख्य दरवाजा ने बाहेर पडली. गडाच्या बाहेरून पूर्ण तटबंदी मशाल फेरी झाली. यावेळी शिवरायांची गाणी स्फूर्तीगीते यावर उपस्थितानी ताल धरला आणि हातात मशाली घेऊन सर्व दुर्गवीर आनंदाने अक्षरशः बेफान होऊन नाचू लागले. जय भवानी जय शिवराय च्या घोषणांनी गड दणाणून गेला होता. शेवटी गडावर असलेल्या तोफांच्या परिसरात रिंगण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमात रामगड सरपंच शुभम मठकर ,उपसरपंच राजेंद्र जाधव, किर्लोस सरपंच : साक्षी चव्हाण, अजित राणे, दुर्गवीर माजी उपाध्यक्ष नितीन पाटोळे, दुर्गवीर सदस्य लक्ष्मण घाडीगावकर, ग्रामस्थ भालचंद्र पवार, दत्तगुरु गावकर, माजी सैनिक अनिल तोंडावळकर, सुरेश घाडीगावकर, अर्जुन बापार्डेकर, परेश सावंत, दिगंबर भाटे, सायली येरुणकर मिलिंद चव्हाण, मधुकर विचारे, लक्ष्मण घाडीगावकर, शुभम घाडी, तुषार चव्हाण, गणेश मालंडकर, सुबोध चव्हाण, प्रणय चव्हाण, ओंकार पालव, हार्दिक परब, रोहन साटम, उन्मेष परब, विनय घाडीगावकर, सिद्धेश मेस्त्री, सिंद्धीका मेस्त्री, मनोज मेस्त्री, भूषण परब, सागर घाडी यांसह बहुसंख्येने रामगड ग्रामस्थ उपस्थित होते.





