पाट येथील कै. सौ. एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर

विद्यान आणि वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के

कै . सौ सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला विभागाचा निकाल ९१.६६% लागला असून विज्ञान मधून कुमारी सामंत अर्पिता अमेय 83 टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कुमारी परब दीक्षा शंकर 74.83% गुण मिळवून द्वितीय आणि घोगळे शाल्मली शंकर हिने 74.33℅ गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेचे 66 मुलांपैकी 66 विद्यार्थी पास होऊन निकाल शंभर टक्के लागला.
वाणिज्य विभागामधून प्रथम क्रमांक पाटकर अथर्व उत्तम 82.33% , द्वितीय क्रमांक पाटकर रिया राजन 79.83% तर वझरकर वैभव वासुदेव 78.67% गुण मिळवून तृतीय आला .
वाणिज्य विभागातून 64 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. वाणिज्य विभागाचा निकाल देखील शंभर टक्के लागला तर कला विभागामध्ये आरोलकर प्रियांका गोविंद हिने77.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला . परब वेदश्री ज्ञानेश्वर 59.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर पाटील लाडू मधुकर 56 टक्के गुण मिळवून तृतीय आला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले . त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही संस्था व विद्यालयातर्फे खास अभिनंदन करण्यात आले

error: Content is protected !!