रस्त्यावरील बेघर निराधार माणसं हे आपले बांधव.

त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळायला हवे – संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था
दोन बेघर निराधार भगिनी आणि एका बांधवांस समर्थ आश्रमचा सहारा.
मुंबई, पालघर मधील तीन बांधव समर्थ आश्रमात दाखल.
विविध कारणांनी समाजात रस्त्यावरील बेघर, निराधार जिने ज्यांच्या वाट्याला येते, अशी माणसं आपल्या सर्वांचे बांधव आहेत,त्यांना सन्मानाचे जीवन मिळायला हवे. असे सांगून…….ज्यांचे या जगात कोणी नाही. त्यांच्यासाठी आम्ही आहोत.” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी नुकतेच मुंबई पालघर जिल्ह्यातील तीन बेघर निराधार बांधवांना आश्रमात केले.या पार्श्वभूमीवर संदिप बोलत होते.
‘ज्यांचे या जगात कोणी नाही.त्यांच्यासाठी आम्ही जीवन आनंद संस्था आहे.’ …या उक्ती नुसार जीवन आनंद संस्थेच्या आश्रम आणि शेल्टर होम चे समाजातील बेघर निराधार वंचित बांधवांसाठीचे कार्य सुरू आहे. संस्थेचे संस्थापक संदिप परब यांना मुंबईत गिरगाव मध्ये सुनिल पाटोळे (56) हे इसम जखमी अवस्थेत व माटुंगा येथे एक वयोवृद्ध महिला आकाबाई सावंत (70) बेघर निराधार स्थितीत आणि पालघर स्टेशन परिसरात एक अनोळखी महिला (अंदाजे वय:52) मानसिक आजारी आणि बेघर निराधार अवस्थेत जीवन जगत असल्याची माहिती मिळाली.
बेघर, आजारी व जखमी आणि निराधार बांधवांची माहिती मिळाल्यानंतर संदिप यांनी तात्काळ कुडाळ हून मुंबईत येवून आवश्यक कार्यवाही केली. आश्रमातील सहकारीनसह आणि नागरिक व पोलिसांच्या मदतीने वरील तिन्ही व्यक्तिंना रीतसर प्रक्रिया करून संस्थेच्या विरार फाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले.
पालघर पोलीस ठाणे अंमलदार संजय वळवी,प्रकाश देसले आणि अन्य सर्व वरीष्ठ अधिकारी, पोलीस स्टेशन मधील सफाई कामगार महिला इत्यादी सर्वांचे चांगले सहकार्य राहिले.
जीवन आनंद संस्थेचे रूपेश गावडे, मीना पटेल, भाईदास माळी, दिपक अडसुळे, चंदा छेत्री, श्रेया घाडीगावकर, दिपाली माळी या सहकारीनची बांधवांना आश्रमात दाखल करण्यात मोलाची भूमिका राहिली.





