‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला

रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित ‘भुलभुलय्या’ नाटकाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कलाकारांनी वालावल मधील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली व मंदिर परिसरातील निसर्गाचे ही पाहणी केली.
सामाजिक कार्यकर्ते रणजीत देसाई आणि केदार सामंत यांची रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन तर्फे निर्मिती असून त्यांच्यातर्फे भुलभुलय्या नाटकाची निर्मिती केलेली आहे. या नाटकामधील दिग्गज कलाकार प्रिया लक्षीकांत बेर्डे , आरती सोळंकी, अमीर तडवलकर, साहिल देसाई, डॉ. परिणीता पावसकर, आशुतोष घोरपडे आणि विजय सूर्यवंशी हे उपस्थित होते. तर निर्माते रणजित देसाई आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.
देवस्थान कमिटीच्या वतीने सर्वांचा लक्ष्मीनारायणाची प्रतिमा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि कलाकृतीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने सदस्य संदीप साळसकर, व्यवस्थापक, आकाश मटकर आणि कल्पेश वालावलकर उपस्थित होते. संपूर्ण मंदिराची या कलाकारानी माहिती जाणून घेतली आणि पाहाणी केली. कलाकारांच्या पुढील वाटचालीसही देवस्थानच्या वतीने संदीप साळसकर यांनी शुभेच्छा दिल्या.





