ॲड. राजेश परुळेकर यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने सत्कार

जिल्हा बार असोसिएशनच्या चेंबरचे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले पूर्ण करून
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या चेंबरचे नूतनीकरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून पूर्ण करून दिल्याबद्दल ॲड. राजेश गजानन परुळेकर कणकवली यांचा सर्वोच्च न्यायालय चे न्यायाधीश प्रसन्न वराळे नवी दिल्ली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी माधव जामदार कोल्हापूर सर्किट बेंच मुख्य न्यायमूर्ती, अभय अहुजा, फरहान दुभाष न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, सुधीर देशपांडे जिल्हा न्यायाधीश सिंधुदुर्ग, ॲड. संग्राम देसाई महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य, श्री परिमल नाईक अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन सिंधुदुर्ग हे हजर होते.





