अखेर जानवली मधील सर्विस रस्त्याचे काम पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू

जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपा कडून सातत्याने केला होता पाठपुरावा

कणकवली मधील जानवली येथे महामार्गावर हॉटेल रिलॅक्स समोर सर्विस रस्त्याचे काम गेले अनेक वर्ष अपूर्ण स्थितीत होते. याबाबत जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात एक महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व हे काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर नुकतेच या सर्विस रस्त्याचे काम महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन कडून सुरू करण्यात आले असून त्यामुळे शिक्षक कॉलनी तरंदळे फाटा या ठिकाणाहून महामार्गाला जोडणारा अरुंद सर्विस रस्ता आता रुंद होणार असून या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे जानवली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपाचे देखील जनतेतून आभार व्यक्त केले जात आहेत.

error: Content is protected !!