भाजपाचे प्रमोद जठार यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

प्रदेशाध्यक्षांनी पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

भाजपा कडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक नवीन जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोट्यातून आमदार होऊ घातलेले प्रमोद जठार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांचे मार्गदर्शन, पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि जनतेचा विश्वास या बळावर पुढील वाटचाल अधिक जोमाने करणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा माझा संकल्प आहे. असे माजी आमदार व आता विधान परिषदेवर नव्याने आमदार म्हणून बिनविरोध झालेले प्रमोद जठार यांनी सांगितले.

error: Content is protected !!