मराठा समाजाच्या वतीने समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरिता सोमवारी कणकवली मोर्चा

गृहमंत्र्यांचा व लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा करणार निषेध
आमदार वैभव नाईक व बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
कणकवली तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्र्यांचा व मराठा समाजावर जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरता सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी उद्या रविवारी सकाळी 10.30 वाजता या मोर्चाच्या नियोजनाची बैठक मराठा मंडळ हॉल कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कणकवली सहित जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार राणेंची मराठा समाज विषयीची भूमिका ही सोयीस्कर असते. काँग्रेसमध्ये असताना धर्मनिरपेक्ष तर आता भाजपमध्ये गेल्यावर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन नितेश राणे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





