3 सप्टेंबर रोजी कणकवली मध्ये ‘उरी पाऊस’ दाटणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीतप्रेमी कलावंतांनी एकत्र येऊन रसिक श्रोत्यांसाठी ऊरी पाऊस दाटला या संगीत सोहळ्याचे रविवार 3 सप्टेंबर रोजी साय.5 वा वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे खास आयोजन केले आहे.
रसिक प्रेमी ना चिंब भिजवणारी गाणी रसिकांच्या भेटीला येणार आहेत पावसाचा आनंद द्विगुणित करायला. प्रकाशन झाल्यानंतर नावाजलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या गाण्यांचा रसिकांना आस्वाद घेता येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहून काव्यानंदात चिंब भिजण्यासाठी मोठ्या संख्येनेउपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली / प्रतिनिधी