वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवा !

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे महावितरणला आवाहन

महावितरणला समस्यांची यादीच केली सादर

अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची घेतली भेट

ऑक्टोबरमध्ये ग्राहक मेळावे आयोजित करण्याची मागणी

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना जिल्ह्यातील तमाम वीज ग्राहकांच्या विविध अडचणी, समस्या तसेच सूचना, प्रलंबित मागण्या बाबत लेखी निवेदन देण्यात आले. वीज ग्राहकांच्या अडचणी सोडावा असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे जिल्ह्यातल्या विविध उपविभागात कोणत्या अडचणी आहेत त्याकडे जिल्हा वीज ग्राहक संघटनेने अधीक्षक अभियान विनोद पाटील यांचे लक्ष वेधले आहे. त्याच बरोबर १० ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सर्व उपविभागामध्ये ग्राहक मेळावे आयोजित करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सिंधुदुग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, वीज ग्राहक संघटना जिल्हा समनवयक नंदन वेंगुर्लेकर, श्री. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना उपाध्यक्ष द्वारकानाथ घुर्यें, वीज ग्राहक संघटना तालुका अध्यक्ष गोविंद सावंत, खजिनदार कुडाळ तालुका व्यापारी संघटना, नितिश म्हाडेश्वर, सचिव कुडाळ तालुका व्यापारी संघटना, भूषण मठकर तसेच सरपंच आदी उपस्थीत होते.
यावेळी विनोद पाटील यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हा वीजग्राहक संघटनेने जिल्ह्यातील विविध भागात वीज ग्राहकांसोबत आढावा बैठका घेतल्या असता जिल्ह्यातील वीज ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आले आहे तसेच यातील बऱ्याच समस्यांचे अनेक वर्ष महावितरण कडून निराकरण न झाल्याचे समजले आहे तरी सिंधुदुर्ग | जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या खाली नमूद करत असून त्यासमस्यांचे तात्काळ निराकरण करून विजग्राहकांना न्याय द्यावा ही विनंती;

उपविभाग- सावंतवाडी

1) आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करणे.
2) ग्रामीण भागात अखंडित विजपुरवठ्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे.
3) निष्क्रिय कर्मचाऱ्यांच्या कामाचा अहवाल तपासून त्यांच्यावर योग्यती कारवाई करणे.
4) कमी दाबाच्या वीज पुरवठ्‌यावर उपाययोजना करणे.
5) माडखोल येथे कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करणे.
6) सावंतवाडी शहरात विदयुत वाहिन्यांना गडिंगची व्यवस्था करणे.

उपविभाग- कुडाळ

1) कुडाळ शहरासाठी आवश्यकते प्रमाणे किमान 10 transformer उपलब्ध करून देणे.
2) कुडाळ उपविभागीय क्षेत्रातील जीर्ण झालेले खांब तात्काळ बदलणे..
3) कुडाळ शहरात भूमिगत विदयुत वाहिनी संदर्भात पाहणी करून कार्यवाही करणे.

उपविभाग कणकवली

1) कलमठ गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून यावर शाश्वत उपाययोजना करणे. 2) नांदगाव मध्ये गेली दोन वर्ष कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे यामुळे विद्युत यंत्रांचे नुकसान होत असल्याने उपाययोजना कराव्यात.
3) वैभववाडी शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन गेली दोन वर्षे तेथील व्यापाऱ्यांनी मागणी करूनही उपाययोजना केलेल्या नाहीत तरी तेथील विविध प्रश्न समजून त्याचे निराकरण करणे.
4) कणकवली शहरातील सोणगेवाडी येथे देवगडवरील लाइन असल्यामुळे तिथे कायम लाईटचा त्रास उद्भवतो तरी याभागात कणकवली येथून विद्युत पुरवठा करण्यात यावा.

उपविभाग – वेंगुर्ला

1) सडलेले वीज पोल तत्काळ बदलून मिळावेत.
2) नादुरुस्त वीज मीटर त्वरित बदलून मिळावेत.
3) मंजूर ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवण्यात यावेत.
4) वीज बिलांची दुरुस्ती करून देण्याचे अधिकार उपविभागातील अधिकाऱ्यांना द्यावेत.
5) शेतकऱ्यांच्या बागेतून, घरावरून गेलेल्या वीज, पोल तसेच तारा यांचे शिफ्टींग लवकरात लवकर करण्यात यावे.

उपविभाग ओरोस

1) कसाल ते सोनवडे हा फीडर जिल्ह्यातील सर्वात जास्त लांबीचा (सुमारे 36 किमी) एवढा असून येथील मेन लाइन सन 1972 मध्ये विद्युत जोडणी केल्यापासुन आजतगायत लाइन अथवा पोल बदललेले नाहीत. सबब या भागातील वीज ग्राहकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने विविध विदयुत उपकरणांमध्ये बिघाड होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। तसेच याभागात वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
2) आंब्रड पंचक्रोशीमध्ये दोन महाविद्यालये व पाच माध्यमिक विद्यालये असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
3) यावर उपाय म्हणून आंब्रड येथे sub station होणे आवश्यक वाटते अथवा घोडगे, सोनवडे, कुपवडे, भरणी या गावांना कनेडी substation वरून विद्युत पुरवठा करणे सोयिस्कर वाटते व कुंदे, कुसबे, पोखरण व आंब्रड या गावांना बोर्डवे (ता. कणकवली) येथून विदयुत पुरवठा करणे सोयिस्कर वाटते.
4) कुंदे, कुसबे, पोखरण, आंब्रड यागावांना कायमस्वरूपी वायरमन मिळणे आवश्यक आहे.
5) कळसूली फीडर वरुण आवश्यक त्यावेळी आंब्रड पंचक्रोशीत विदयुत जोडणीची तरतूद करावी.
6) ढोकमवाडी येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणे व लाईन स्वतंत्र करणे.
7) कार्लेवाडी येथील कसाल ग्रामपंचायत नळयोजनेसाठी वीजपुरवठा होत असलेल्या ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढविणे.
8) कसाल बाजारपेठतील स्मशानभूमी साठी 2 पोल टाकणे.

तसेच खलील महत्वाच्या बाबींवर कार्यवाही करणेस विनंती आहे;

1) सर्व उपविभागांमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 याकालावधीत ग्राहक मेळावे आयोजित करणे.
2) सिंधुदुर्ग जिल्हयासाठी PRO ची नियुक्ती करणे.

असे निवेदन यावेळी विनोद पाटील यांनी देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!