इन्सुली खामदेव नाका येथे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात

बांदा तलाठी जखमी

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका नजीक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. या अपघातात बांदा येथील तलाठी वर्षा जयंत नाडकर्णी जखमी झाल्या. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले. महामार्ग विभागाने खड्डे न बुजविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करत संबंधित विभागाबाबत नाराजी व्यक्त केली.

error: Content is protected !!