खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुहास राऊत यांची निवड

खारेपाटण या गावच्या खारेपाटण गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी खारेपाटण कोंडवाडी येथील युवा कार्यकर्ते श्री सुहास राऊत यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
खारेपाटण सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच ग्रा.पं.कार्यालयात संपन्न झाली.या सभेत श्री सुहास राऊत यांची खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामविकास अधिकारी जी एस वेंगुर्लेकर,तंटामुक्ती समितीचे सचिव व पोलीस पाटील श्री दिगंबर भालेकर सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव,संतोष पाटणकर,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये माजी उपसरपंच इस्माईल मुकादम,माजी पोलीस पाटील बाळा शेट्ये,ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत गांधी,प्रकाश मोहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच खारेपाटण ग्रा.पं.सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे,जयदीप देसाई, किरण कर्ले,सुधाकर ढेकणे,सौ. मनाली होणाळे,शीतिजा धुमाळे, अमिषा गुरव,दक्षता सुतार,अस्ताली पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विविध स्तरातील सदस्य व घटकांतील नागरिकांचा समावेश अस असलेली सन २०२३ – २४ या एका वर्षांकरिता नवीन खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती निवडण्यात आली.
खारेपाटण मधील सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी असून गावातील तंटे गावातच मिटवून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सुहास राऊत यांनी यावेळी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण