देवगड मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का!
नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नगरसेवक रोहन खेडेकर शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाला देवगड मध्ये जोरदार धक्का बसला असून, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, संदेश पटेल आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली