सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी किशोर तावडे यांची नियुक्ती

यापूर्वी जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून केले आहे काम

लोकाभिमुख काम करणारे अधिकारी म्हणून आहे श्री. तावडे यांची ओळख

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर या पदावर श्री. तावडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. श्री. तावडे यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक या पदावर श्री. तावडे सध्या कार्यरत होते. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर देखील त्यांनी काम केले आहे. 1995 मध्ये परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रुजू झाले होते. 2000 ते 2002 या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. तर 2011 ते 2014 या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. लोकाभिमुख काम करणारे अधिकारी म्हणून श्री तावडे यांची ओळख आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!