डॉ. अरुणा ढेरे यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान
रंगकर्मी शफाअत खान यांच्या हस्ते डॉ. ढेरे सन्मानित
बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू अकादमी यांच्या मार्फत दिला जातो पुरस्कार
निलेश जोशी । कुडाळ : बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आरती प्रभू कला अकादमी कुडाळ आयोजित आरती प्रभू पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी कुडाळ मध्ये थाटात संपन्न झाला. सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी नाटककार शफअत खान यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम अस या पुरस्काराच स्वरूप आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात कै एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. आरती प्रभू हे कुडाळचे. त्यामुळे कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीनं नाट्य आणि कविता या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. अरुणा ढेरे याना जाहीर झाला होता. आज त्याच वितरण करण्यात आलं. या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात शफआत खान, अरुणा ढेरे, वर्ष वैद्य, माईसाहेब तळेकर, चंदू शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच देवी सरस्वती आणि आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यांनतर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. अरुण ढेरे यांना द्यायच्या मानपत्राचं वाचन शमा वैद्य नाईक यांनी केलं. त्यांनतर शफाअत खान यांच्या हस्ते डॉ. अरुणा ढेरे याना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात डॉ. अरुणा ढेरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष भाईसाहेब तळेकर यांनी आरती प्रभू कला अकादमी बाबत माहिती दिली. लवकरच आरती प्रभू कला अकादमीच बांधकाम पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. चिंत्र्य खानोलकरांच्या प्रतिभेने झपाटलेली जी झाडं होती त्यातल मी एक झाड आहे, असे उद्गार कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. आरती प्रभु यांच्या साहित्यविषयक आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. प्रमुख अतिथी शफआत खान यांनी अरुणा ढेरे यांच्या साहित्याविषयी आपले विचार मनोगतातून मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वर्षा वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणातून पुरस्कारप्राप्त डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिनंदन केलं. तसंच पुढचा आरती प्रभू पुरस्कार सोहळा आरती प्रभू कला अकादमीच्या स्वतःच्या वास्तूत होईल असं सांगितलं.
उपस्थित मान्यवरांचं स्वागत डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक केदार सामंत यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं. या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनंत वैद्य, उदय पंडित, अरविंद शिरसाट, डॉ. व्ही.बी. झोडगे, दादा शिरहट्टी तसच अनेक साहित्य प्रेमी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.