सोल्जर ऑफ कॉन्स्टिटयूशन पुरस्काराने नामदेव मठकर यांचा सन्मान

ब्युरो न्युज । सिंधुदुर्ग ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स न्यू दिल्ली तर्फे मठ (सिद्दार्थ नगर) ता. वेंगुर्ला येथील मूळ रहिवाशी व सध्या ओरोस, ता. कुडाळ येथे राहत असलेले, जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग चे सेवानिवृत्त अधीक्षक एन. पी. मठकर (नामदेव मठकर) याना न्यायालयीन सेवेत कार्यरत असताना उत्कृष्ठ सेवेबद्दल सोल्जर ऑफ कॉन्स्टिटयूशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्कार प्रसंगी मठकर यांचे सोबत बंधू शंभू यशवंत मठकर, ओरोस येथील रहिवासी मुंबई निवासी राजन भगवान कदम, कु. आर्यन राजन कदम हे उपस्थित होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीच्या शताब्दी निमित्त ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स दिल्ली तर्फे ३६ वर्ष ०९ महिने न्यायालयीन सेवा उत्कृष्ट पणे पूर्ण करून सेवा निवृत्त झालेले मठकर यांचेसह उत्कृष्ट वकिली करणाऱ्या कर्नाटक, झारखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील १०१ मान्यवरांना सोल्जर ऑफ कॉन्स्टिटयूशन

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. २८ जुलै रोजी कल्याण येथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. असोसिएशन्स चे अध्यक्ष ऍड. रवी जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. प्रकाश जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल चे अध्यक्ष ऍड. गजानन चव्हाण, ऍड. गोपाळ भगत, ऍड. गौतम खरात, ऍड. सुहास रावळे, ऍड. रंजना भोसले, ऍड. राजेश झाल्टे, ऍड. प्रशांत बाविस्कर, ऍड. चंद्रशील दंदी, ऍड. डॉ. मोहन गवई ऍड. सत्यप्रकाश गौतम (दिल्ली) ऍड. मदनलाल कलकल (दिल्ली) ऍड. राजकुमार भारत, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, माजी जिल्हा न्यायाधीश यशवंत चावरे (रायगड), ऍड. डॉ. डी. के. सोनावणे माजी मुख्य सहाय्यक नायदंडाधिकारी मुंबई, ऍड. राहुल मखरे, ऍड. संजय मोरे (सरकारी वकील), ऍड. रोशन लाल (दिल्ली), ऍड. संघराज रुपवते (मुंबई) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात कुडाळ न्यायालयातील वकील व्यवसाय करणाऱ्या ऍड. रुपाली कदम यांना सोल्जर ऑफ कॉन्स्टिटयूशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मठकर यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, कृषी, शैक्षणिक व व्यापार क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!