जिल्हास्तरीय उड्डाण महोत्सवात खारेपाटण महाविद्यालयाचे घवघवीत यश

खारेपाटण: कणकवली महाविद्यालय येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी उड्डाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सांस्कृतिक विभागाच्या युवा महोत्सवाच्या धरतीवर उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, क्रिएटिव्ह स्टोरी रायटिंग, पोस्टर मेकिंग आणि वकृत्व स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यातील क्रिएटिव्ह स्टोरी रायटिंगमध्ये नाहीद अक्तार हिने प्रथम क्रमांक; तर वकृत्व स्पर्धेत दीक्षा उंबळकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. गजानन व्हंकळी, सदस्य -प्रा.प्रकाश शिंदे, प्रा. माधवी पांचाळ, प्रा.अक्षता मुंडकर तसेच सहभागी विद्यार्थी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे सर यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!