कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून नियुक्ती

कणकवलीत जवळपास 6 वर्षे अवधूत तावडे यांनी मुख्याधिकारी म्हणून केले काम
कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची पदोन्नतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बदली झाली आहे. अवधूत तावडे हे गेली दोन वर्षे कणकवली नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी तब्बल चार वर्षे कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी म्हणून त्याने काम केले होते. त्यानंतर त्यांची उरण येथे बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन वर्षापूर्वी ते कणकवलीत रुजू झाल्यानंतर त्यांनी कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हाती घेतली. शिस्तप्रिय अधिकारी व प्रशासकीय कामात नेहमीच अलर्ट असणारे अधिकारी म्हणून श्री. तावडे यांची ओळख आहे. कणकवली मुख्याधिकारी सोबतच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून देखील त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कणकवली नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
दिगंबर वालावलकर /कणकवली