वर्षा कुडाळकर यांचा अतुल बंगे यांच्या एवढा अभ्यासच नाही !

तेंडोली जि प शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर

अभ्यास नसल्याने तेंडोली मतदार संघ ५ वर्ष मागे

प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना नेते अतुल बंगे यांच्या एवढा गाढा अभ्यास जि प माजी सदस्या वर्षा कुडाळकर यांना नक्किच नाही. म्हणूनच तेडोली जि प मतदार संघ पाच वर्षांनी विकासापासून मागे गेला असा आरोप पाट तेंडोली जि प शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात महेश वेळकर वर्ष कुडाळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘शिवसेना नेते अतुल बंगे यांनी अभ्यास करुनच बोलावे’ या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. श्री. वेळकर म्हणतात, अतुल बंगे हे आमचे नेते आहेत. आजपर्यंत शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर तालुक्यातील परखड बोलणारे व्यक्तीमत्व म्हणून श्री बंगे यांच्याकडे आम्हीं शिवसैनिक पहातो,
श्रीमती कुडाळकर तुम्ही निवडणुकीत उभे राहीलात त्यावेळी आम्ही स्वतःच्या घरच अन्न खाऊन तुमचा प्रचार केला. त्यावेळी तुम्हीं अनेकांना न वटणारे चेक देऊन मत मागितलात तरी तुमच्या सतत रडण्याच्या पध्दतीने मतदारांनी थोडे भावुक होऊन मतदान केले आणि शिवसैनिकांनी जिवाचे रान करुन तुम्हाला निवडुन दिले. यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर तुम्ही निवडुन आलात. त्यानंतर सतत कामे विकुन टक्केवारी घेऊन आपली पाच वर्षे काढली, असा आरोप श्री वेळकर यांनी केला.
शिवसेनेने तुम्हाला मोठं मोठी पदे बहाल करुनसुद्धा तुम्ही गद्दारी केलात, शिवसेनेच्या अनेक बैठकांमध्ये तुम्ही रडगाऱ्हाणे ऐकवण्यापलीकडे काहीच केलात नाही . श्री बंगे यांनी शाळेला दिलेल्या ताडपत्री बाबत पालकांनी बंगे यांचे आभार मानले. त्याचे वाईट वाटण्याचे कारण काहीच नव्हते. परंतु तेंडोली जि प मतदार संघाचे नाव पिंगुळी ते रायगड पर्यंत पोहोचवणाऱ्या अकार्यक्षम श्रीम कुडाळकर यांनी पुन्हा पिंगुळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभ राहून सदस्य तरी निवडुन येऊ शकता का ते आम्ही पहातो असे आव्हान श्री वेळकर यांनी श्रीम कुडाळकर यांना दिले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!