कणकवली तालुक्यातील वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाख मंजूर

युवा सेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती

वाघेरी, ता.कणकवली गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला वाघेरी गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) या खड्येयुक्त रस्त्यासाठी पुरवणी बजेट मधून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकदारांसह वाहतूकदार व ग्रामस्थांची मागणी होती. या मागणीची दखल घेत युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून रस्त्याला निधी मंजूर झाल्याने गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. आणि गावची समस्या सुटण्यास मदत झाल्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून आपण वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत असे सिद्धेश राणे यांनी सांगितले.‌

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!