शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे केक कापून केला वाढदिवस साजरा

शासकीय निवासस्थानी वाढदिनी अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांच्यावर मंगळवारी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी वाढदिनी शुभेच्छा वर्षाव करण्यात आला मंत्रालय मधील कर्मचारी वर्ग तसेच मुंबई कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळी पत्नी पल्लवी केसरकर यांच्याकडून मंत्री दीपक केसरकर यांचे औक्षण करण्यात आले.
त्यानंतर सर्वाच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.कार्यकर्त्यांनी मंत्री केसरकर यांच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या प्रकारचे केक आणले होते.
मंत्री केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार तसेच सर्वच मंत्री आमदार यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिद्धी विनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर,शिवसेना पदाधिकारी राहूल कनाल,अधिकारी सुशांत खांडेकर,बिपीन चव्हाण योगेश तेली उपस्थित होते.