कणकवली रोटरी क्लब चा पदग्रहण सोहळा उत्साह

रोटरीयन सदस्यांनी विविध उपक्रम राबवण्याचा केला मनोदय

रोटरी मध्ये समाजाचा सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करून उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. रोटरी मध्ये या सर्व स्तरांवर परिवर्तन घडविण्याची ताकद आहे त्यासाठी बारा लाख रोटरीयन जगभर कार्यरत आहेत. डिस्टिक गव्हर्नर व इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन शरद पै यांच्या अध्यक्षतेखाली, ए जी रोटरीयन राजेंद्र बोभाटे एरिया हेड प्रणय तेली एजी रोटरीयन दीपक बेलवलकर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल (81153) चा 16 व्या प्रेसिडेंट शंकर उर्फ (रवी) परब यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष शंकर परब, नूतन सेक्रेटरी प्राध्यापक जगदीश राणे मावळते अध्यक्ष वर्षा बांदेकर, सेक्रेटरी सौ उमा परब व्यासपीठावर उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षांनी आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष शंकर परब यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जल व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यासंबंधी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथील भगीरथ प्रतिष्ठानच्या डॉक्टर प्रसाद देवधर यांना 4 वे टेस्ट ची प्रतिमा देऊन रोटरी तर्फे सन्मान करण्यात आला. ते म्हणाले आपल्या सामाजिक सुधारणांची वाट प्रत्येक नागरिकाच्या घरातून व त्याच्या त्यागातूनच होईल. कार्बनमुक्त वातावरणासाठी, धूर विरहीत स्वयंपाक घरासाठी सर्वांनी एकत्र येवून बायो गॅस उपाय योजना क रावी असे त्यांनी आवाहन केले. रोटरीयन प्रणय तेली यांनी डिस्ट्रिक्ट मधील सर्व क्लब मधील रोटरीयन्सची एकमेकांशी ओळख करून दिली व एकत्रित प्रोजेक्ट व्हावे असा त्यांचा मानस आहे. नूतन कार्यकारिणीस त्यांनी त्यांच्या काव्य शैलीत शुभेच्छा दिल्या. रोटरीयन ए जी राजन बोभाटे यांनी काम करत असताना निर्माण झालेल्या समस्यांवर ससा व कासवाच्या गोष्टीतून कशाप्रकारे मात करता येते हे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डीजी इन्स्टॉलिंग ऑफिसर Rotarian शरद पै म्हणाले कणकवली रोटरी क्लब हा व्हायब्रंट क्लब आहे व त्याला डायनॅमिक पर्सनॅलिटीचे प्रेसिडेंट चा वारसा लाभला आहे. नूतन कार्यकारिणीने याचा फायदा घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम करावे व आपल्या क्लबचे नाव आणखी उंचीवर न्यावे. ग्लोबल ग्रँट साठी मी कधीही प्रयत्नशील आहे तुम्ही सर्व वलब ने मिळून मोठा प्रोजेक्ट करावें व प्रसाद देवधर यांच्या कार्बनमुक्त अभियानामधील बायोगॅस प्रकल्पासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे मी तुमच्या सोबतच आहे. तसेच कार्यक्रमात जिल्ह्यातील दहावी बारावी परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. रोटरीतील भरीव कामगिरी केलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा देखील सत्कार सोहळा करण्यात आला. यशस्वी उद्योजिका यांना शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार केला. कै. रोटरीयन रवींद्र मुसळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे निकट वर्तीय स्नेही व शिक्षक बंधू शरद सोनू साळगांवकर सरांना शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वैजयंती मुसळे यांनी त्यांचे पती रवींद्र मुसळे यांचे रोटरीतील राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी रोटरी सदस्य पद घेतल्याचे सांगितले. नूतन सेक्रेटरी प्राध्यापक जगदीश राणे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली सर्व रोटेरीयन नी आपापली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळे व रोटरीयन स्नेहलता राणे व राजेश कदम यांच्या संयुक्त सूत्रसंचालनाने कार्यक्रम यशस्वी झाला. सर्व रोटरीयन आभार व पुढील कार्यकाळात शुभेच्छा दिल्या.

कमकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!