राष्ट्रवादी काँगेसचे हल्लाबोल आंदोलनं आश्वासनाअंती मागे

वाहतुक निरीक्षकांकडून लेखी आश्वासन; दिल्यानंतर अन्यथा १५ ओगस्टला
सावंतवाडी येथील सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं हल्लाबोल आंदोलन अखेर आश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील बस स्थानक परिसरात असलेल्या समस्या बाबत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बस स्थानकाला धडक दिली. यावेळी विविध समस्या बाबत त्यांनी आगार व्यवस्थापकांचा लक्ष वेधले .मात्र त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्यानी ते आंदोलन सुरूच ठेवले होते .अखेर वाहतूक निरीक्षकांकडून १२ ऑगस्टपर्यंत आपण समस्या सोडू असे लेखी आश्वासन दिल्यानेत्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र 12 ऑगस्टपर्यंत समस्यांना न सुटल्यास आम्ही पुन्हा 15 ऑगस्टला हल्लाबोल आंदोलन करूअसा इशारा देखील घारे परब यांनी यावेळी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सावंतवाडी बसस्थानक प्रसिद्ध आहे. येथून पुणे, कोल्हापूर, मुंबई, शिर्डी अशा अशा लांबपल्याच्या गाड्या धावतात. नेहमी या स्टॅण्डवर प्रवासी आणि पर्यटकांची गर्दी दिसून येते. मात्र आजकाल हे बसस्थानक वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रथम भल्या मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागेल. छताला पूर्णपणे गळती लागली आहे.. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे? असा प्रश्न आहे.
काही दिवसापूर्वी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी या खड्ड्यांची पाहणी केली होती. आणि १५ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र अजून एसटी प्रशासन जागे झालेले नाही. आज घारे परब यांनी आज आंदोलन केले. एकंदरीत सुंदर सावंतवाडीच्या चेहरा असा गोष्टींमुळे बदलत आहे. बस स्थानकाची अवस्था विद्रुप झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निवासस्थान या बसस्थानकाला लागूनच आहे.त्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी,अशी मागणी केली होती. आज सावंतवाडी येथील सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं हल्लाबोल आंदोलन अखेर आश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब ,तालुका प्रमुख पुंडलीक दळवी, हिदायुला खान, दर्शना बाबर देसाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सावंतवाडी प्रतिनिधि