विद्यार्थी व पालकांनी घेतला आकाश दर्शनाचा लाभ.
यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा तर्फे आयोजन
आचरा : यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा हे नेहमीच विद्यार्थी व पालक यांच्या हितासाठी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्यापैकीच एक म्हणजे आकाश दर्शन अनेक लोकांना आकाश दर्शनासंबंधी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे .आपणही आकाश पहावे आकाशातील खगोलांची माहिती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते आणि ती संधी प्राप्त करून दिली ती यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा यांनी. खगोल अभ्यासक . मंदार माईणकर यांनी उपस्थित खगोल प्रेमींना सुमारे पन्नास हजार वर्षांनी एकदा दिसणारा धुमकेतू दुर्बिणीच्या सहाय्याने दाखविला तसेच आकाशातील ग्रह गोलांविषयी व चंद्राविषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन सर्वांच्या ज्ञानात भर टाकली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या संधीचा लाभ आचरा परिसरातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांनी व खगोल प्रेमींनी घेतला. याप्रसंगी यशराज प्रेरणा ग्रुपचे .मंदार जोशी रानमित्र आचराचे स्वप्निल गोसावी .सुशांत सावंत .राजेश भिरवंडेकर ,मंदार सांबारी यांसह अन्य खगोलप्रेमी आदी उपस्थित होते.
अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा