खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का
वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांचा ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश
खारेपाटण : खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना कनेडी शाखा येथे माजी केंद्रीय मंत्री ,शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. एकनाथ कोकाटे यांच्या समवेत शैलेश कोकाटे अंकिता कोकाटे ,शर्वरी कोकाटे ,शोभा पाष्टे ,शुभम पाष्टे ,प्रमोद केसरकर संगीता गांगण ,आदींसह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत संदेश पारकर संजय पडते अतुल रावराणे सुशांत नाईक शैलेश भोगले प्रथमेश सावंत आदींसह वारगाव मधील ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर वळंजु माजी सरपंच बापू नर बाळा राऊत अंजली मेस्त्री अरुण मेस्त्री संतोष सोरप ,जयेश नागवेकर प्रथमेश नर आदीसह,शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते
खारेपाटण विभागाचे माजी जि प सदस्य स्वर्गीय बाळा वळंजु यांचे विश्वासू सहकारी राहिलेले एकनाथ कोकाटे हे खारेपाटण विभागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते ग्रामपंचायत निवडणुकीनंतर त्यांनी काही दिवसातच आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहकाऱ्यांसमवेत त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.
अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ / खारेपाटण