” मोदी @ 9 ” अभियानाचे लोकसभा संयोजक केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर

वेंगुर्ला

     मोदी @ 9 अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३० मे ते ७ जुन या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा अहवाल सावंतवाडी विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघाचे संयोजक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिखित स्वरूपात सुपूर्द केला. ३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघात ” विशेष जनसंपर्क अभियान “राबविण्यात आले. तसेच जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र आणि बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम दिले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले, सावंतवाडी , आंबोली , बांदा , दोडामार्ग या मंडलात पत्रकार परिषद , टिफीन बैठक , विकास तीर्थ , जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , संयुक्त मोर्चा संमेलन , लाभार्थी संमेलन , योग दिन , व्यापारी संमेलन , बुद्धीवंत संमेलन , संपर्क से समर्थन , सोशल मिडीयावरील प्रभावशाली व्यक्तींशी संवाद , मन की बात , सरपंच व उपसरपंच बैठक , अनुसूचित जाती मोर्चा बैठक , घर घर संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहीती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली , तसेच ९०९०९०२०२४ हा नंबर प्रत्येकाकडून डाईल करुन मोदीजींना समर्थन दिले .तसेच विधानसभा मतदारसंघातील २५० प्रभावशाली कुटुंबांची यादी करुन २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी १०  कुटुंब संपर्कासाठी विभागुन दिली. यामध्ये समाज घटकातील प्रभावशाली व्यक्तिमत्व, खेळाडु , कलाकार , उद्योजक, हुतात्मा सैनिक , वारकरी तसेच अन्य कुटुंबांशी संपर्क करून मोदी सरकारच्या कार्याचे पत्रक दिले . अशा प्रकारे मोदी सरकारचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले व त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुपूर्द केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा प्रवक्ते संजु परब, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी – प्रमोद कामत – सोमनाथ टोमके, जि.प.उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, आंबोली अध्यक्ष रविंद्र मडगांवकर , दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी, सावंतवाडी अध्यक्ष अजय गोंदांवळे , बांदा अध्यक्ष महेश धुरी , सावंतवाडी महीला अध्यक्षा मोहीनी मडगांवकर , सावंतवाडी सरचिटणीस परिक्षीत मांजरेकर व  विनोद सावंत , नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!