वजराट येथे भाजपा व जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट च्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Image-2023-07-10-at-1.30.10-PM-1.jpeg)
वेंगुर्ला
जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, वजराट येथे दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, व पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं. १ मधील विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेचे शिक्षक व शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या गावातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, पदाधिकारी सोमनाथ टोमके, ज्ञानेश्वर केळजी, डॉ. प्रसाद देवधर, बंड्या सावंत, गावप्रमुख सूर्यकांत परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब, रमेश राणे, अण्णा वजराटकर, ग्रामपंचायत सदस्य रसिका मेस्त्री, प्रवीण कांदे, नामदेव कांदे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच आडेली हायस्कूल मुख्याध्यापक देवानंद चव्हाण, नेमळे हायस्कूल मुख्याध्यापक सौ. बोवलेकर, श्री. खरात , सौ. बांदिवडेकर, सौ. पाताडे , सौ. पाटील, सौ. सुर्वे, श्री. परब या शालेय शिक्षकांचा तसेच रवींद्र मोरे, सावळाराम वजराटकर, आनंद बोवलेकर, विजय कासले, मेघश्याम भिमसेन परब, दिगंबर परब, सोनसुरकर, मारुती पेडणेकर, चंद्रकांत परब, प्रभाकर मेस्त्री या शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त व्यक्तींचा व कोरोना कालावधीपासून आतापर्यंत वजराट गावात चांगले आरोग्य सेवा बजावणारे डॉ. वनकुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वजराट गावाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट चे पदाधिकारी नितीन चव्हाण, वामन भोसले, राजन परब, नितीन परब, आनंद परब, वसंत परब, महेश राणे, विकास चव्हाण, सचिन देसाई यांनी केले.