भिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा झटका
भिरवंडे च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
कणकवली : तालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप ( सॅडू ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत, सुरेंद्र सावंत,जयेश सावंत, तुषार राणे, सुदर्शन वरक, रुपेश सावंत, रोशन चेंदूरकर, संकेत वरक, देवेंद्र दळवी, हार्दिक सावंत, गणेश सावंत,तनिश सावंत,सिद्धेश सावंत,संतोष सावंत,किशोर सावंत (बाबलो),मिलिंद सावंत, अविनाश सावंत, तेजस सावंत, वैभव सावंत, सुनील सावंत,अचित राणे,जयदीप राणे, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे.आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी आमदार नितेश राणे,माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, रमेश सावंत, संतोष सावंत उपस्थित होते.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली