बचत गट व्यवसायाच्या माध्यमातून महीलांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्याचं स्वप्न जिल्हा बँक पूर्ण करणार

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन

मालवण : आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे उद्घाटन या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समोरील ग्राहकाला आपण पुढील ३६५ दिवस बांधून ठेवलं पाहीजे. त्याच्याशी संवाद साधा.त्याला आपल्या व्यवसायाची माहीती द्या.व्यवसायाचा दृष्टाकोन ठेवून विचार करा.आपण ३६५ दिवस कसा व्यवसाय करू शकता हे एकच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांचे उदिष्ट आहे. ना.नारयण राणे साहेबांचं स्वप्न होतं जिल्ह्यातील बचतगटांना बाजारपेठ मिळाली पाहीजे. बाजारपेठेच्या माध्यमातून माता भगीनींच्या व्यवसायात वाढ झाली पाहीजे. त्यांच्या व्यवसायात वाढ झाली तर महीलांच्या दरडोई उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होईल व राणे साहेबांच हे स्वप्न पूर्णत्वास जाईल.आणी ते स्वप्न आमची जिल्हा बँक पूर्ण करतय.असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले *
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे शुक्रवारी करण्यात आला.या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपाध्यश अतुल काळसेकर,जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, सरपंच माधवी पालव, बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई,सौ.नीता राणे,समिर सावंत, व्हीक्टर डान्टस,प्रकाश बोडस,जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, रणजीत देसाई,मनोज रावराणे,संदिप सावंत, प्रभाकर सावंत, बँक अधिकारी देवानंद लोकेगांवकर,पी.डी. सामंत,किशोर गोवेकर, पूर्णानंद सरमळकर, एकनाथ तावडे,सुरज गवंडी, दिपक वारंग, मंदार चव्हाण, स्वप्नील केळुस्कर,आदि मान्यवर उपस्थित होते.या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेस आलेले भाविक व जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक,तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोलतांना मनिष दळवी यांनी सांगीतले मागील वर्षी ८५लाखाची उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली हा टप्पा यावर्षी ओलांडला जाईल. महीलांसाठी जिल्हा बँकेने नविन धोरण आखले आहे. मागील वर्षी ८ कोटीची कर्जे महीलांना वितरीत करण्यात आली. यावर्षी मार्च महीन्यात महिला दिनाचे औचित्य साधून महीलांसाठी वेगवेगळे उपक्रम,योजना राबविण्यात येणार आहेत.बचत गटा मार्फत महीलांचे उद्योग उभे राहीले पाहीजेत. यासाठी जिल्हा बँकेने स्वतंत्र महीला कश स्थापन केला आहे. जिल्ह्यातील महीलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतील.जिल्हा बँक महीलांच्या पाठीशी सदैव उभी राहील.जेव्हा तुमच्या मनात येईल शेती उद्योग,प्रक्रीय उद्योग करावयाचा आहे.या प्रत्येक बाबतीत जिल्हा बँक तुमच्या सोबत उभी राहील.अशी मी ग्वाही देतो असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी यावेळी केले. जिल्हा बचत गटाचे स्टॉलला अनेक मान्यवर पत्रकार यांनी भेट देउन उपस्थित महीलांचे मनोबल उंचावले व समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील सुमारे १०२ महीला बचत गटांनी प्रदर्शन सोहळ्यास सहभाग नोंदवला असून महीला बचत गटांकडील माल खरेदी साठी ग्राहकांनी व मुंबईकर चाकरमान्यानी पहील्या दिवसापसुन गटांच्या स्टॉलवर गर्दी केली आहे. बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कालावधी दि.०३ ते ०५ फेब्रुवारी २०२३असा आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!