शिक्षक बदली प्रक्रियेत काय चुकले मंत्री केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे

माजी आमदार राजन तेली
जिल्हा विकासासाठी १ हजार कोटीची मागणी करा, सरपंचांना आवाहन
सावंतवाडी
जिल्ह्यात राबविण्यात आलेली शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया चुकीची झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ११४ शाळांमध्ये शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. त्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत, असा आरोप करत आपले नेमके काय चुकले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज पत्रकार परिषदेला दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, रविंद्र मडगावकर, आनंद नवगी, अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.





