माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलें यांनी राष्ट्रवादी कोग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली. यावेळी श्री. पवार यांच्याशी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. राष्ट्रवादी फुटीच्या पार्श्वभूमीवर श्री. भोसले यांनी मुंबई येथे जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.





