भोसले नॉलेज सिटीत आता इंजिनिअरिंग डिग्रीचा अभ्यासक्रम

सावंतवाडी

सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीला यावर्षी पासून इंजिनिअरिंग कॉलेजचा दर्जा मिळाला आहे. आता हे कॉलेज यशवंतराव भोसले इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने ओळखले जाणार आहे. या कॉलेजच्या माध्यमातून वर्षाकाठी तीनशे विद्यार्थी तयार होणार आहे. सावंतवाडीसह जिल्ह्यालाही अभिमानाची गोष्ट आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांनी दिली. दरम्यान या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची परवानगी मिळाली असून डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मान्यता मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच आज संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून खास पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली.

यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अस्मिता भोसले, सचिव संजीव देसाई, प्राचार्य गजानन भोसले, सुनेत्रा देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भोसले पुढे म्हणाले, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुर्वी दोन इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. मात्र आता सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील मुलांना याचा फायदा होणार आहे. या कॉलेजच्या माध्यमातून वर्षाकाठी तीनशे विद्यार्थी तयार होणार आहे. यात कॉम्पुटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग, मॅकेनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीक इंजिनिअरिंग आदी कोर्स असणार आहेत.

यावेळी श्री. भोसले पुढे म्हणाले, भोसले नॉलेज सिटी स्थापन करुन नऊ वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे. या काळात आठशेहून अधिक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नोकरी करीत आहे. तर बर्‍याचश्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार उभारला आहे. गेली अनेक वर्षे या कॉलेजमध्ये डिग्री कॉलेज सुरू करण्यात यावे, अशी पालकांची मागणी होती. त्या नुसार त्यांची मागणी पुर्ण करण्यास आम्हाला यश आले आहे. त्यामुळे हे महाविद्यालय भविष्यात नक्क्कीच मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.यावेळी नितीन सांडये, प्रसाद महाले, भूषण सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!