पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला आकाशदर्शनाचा अनुभव

प्रतिनिधी । कुडाळ : शाळेतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पाट हायस्कूलच्या मैदानावर दिनांक १ फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दुर्बिणीच्या मदतीने श्री.ए.के.हाक्के सरांनी चंद्र,ग्रह,तारे विद्यार्थ्यांना दाखवून त्याबद्दल माहिती दिली. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. लक्ष्मण गोसावी यांनी प्रोजेक्टरवर ग्रह, तारे, नक्षत्र व राशी यांचे दर्शन घडविले. त्यांनी आकाशगंगा, आपली सूर्यमाला, त्यातील ग्रह ,तारे यांची वैशिष्ट्ये नक्षत्र व राशींना पडलेली नावे आणि आपली जन्मरास कशी काढतात याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यालयातील आय.टी. शिक्षक श्री.योगेश कासकर सर यांनी मदत केली.
सदर कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री .समाधान परब, संस्था खजिनदार माननीय श्री. देवदत्त साळगावकर ,पाटगावचे माजी सरपंच माननीय मंदार प्रभू ,माननीय श्री. शामराव कोरे, पर्यवेक्षक माननीय श्री. राजन हंजनकर, तसेच विद्यालयातील शिक्षक, पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रमाच्या वेळी संस्था पदाधिकारी व पालकांनी चांगला कार्यक्रम पाहता आला याबद्दल प्रशालेचे कौतुक केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!