गुरुपौर्णिमे च्या निमित्ताने खारेपाटण हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केले विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खारेपाटण शेठ न म विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. खारेपाटण
विभागातील खारेपाटण ,नडगिवे,शेर्पे, वारगाव ,तळेरे यांशिवाय कोर्ले या शाळांतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण UPLP ज्युनियर कॉलेज आणि वामनराव महाडिक ज्यूनिअर कॉलेज तळेरे येथील प्रथम क्रमांक पटकविण्याऱ्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना बहुमोल असे करीअर मार्गदर्शक केले.
या प्रसंगी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर ,कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ,खारेपाटण चे पोलीस नाईक- उध्वव साबळे,संस्था अध्यक्ष प्रविण लोकरे,मुख्याध्यापक सानप ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख- संजय आंग्रे, विधानसभा संघटक -संदेश पटेल ,युवा सेना जिल्हाप्रमुख – सुकांत वरुणकर, तालुका प्रमुख- मंगेश गुरव,तालुका प्रमुख -शरद वायंगणकर, सदस्य- गुरू शिंदे , उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!