कणकवली बांधकाम विभागाचे कर्मचारी भिकाजी तेली यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी केला सत्कार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कणकवली मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत असणारे भिकाजी तेली हे यांचा सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून निवृत्त होत असताना श्री. तेली यांनी जिल्हा परिषद मध्ये केलेली सेवा व जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे असे गौरव उद्गार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी काढले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. तेली यांनी जिल्हा परिषदेने दिलेल्या मानसन्मान बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी श्री तेली यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देत गौरव करण्यात आला.
कणकवली /प्रतिनिधी




