आषाढी एकादशीनिमित्त अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये ‘चंद्रभागेच्या तीरी उभा पांडुरंग’ या विषयावर कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हीचा आला राज्यात द्वितीय

सावंतवाडी
आषाढी एकादशीनिमित्त अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये ‘चंद्रभागेच्या तीरी उभा पांडुरंग’ या विषयावर 7वी ते 8वी या गटातून कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेमध्ये तिच्या या गटात राज्यभरातून 41 स्पर्धक सहभागी झाले होते.या तिच्या यशाबद्दल कुडाळ हायस्कूल कुडाळ च्या शिक्षक वृंदानी विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या.




