बांदा-दोडामार्ग रस्त्यावर तिहेरी अपघात यात गाड्यांचे मोठे नुकसान

सुदैवाने कोणीही जखमी नाही

सावंतवाडी

बांदा येथील दोडामार्ग-बांदा रस्त्याची साईडपट्टी खचल्याने पानवळ येथे तिहेरी अपघात झाला. यात एसटीसह टेम्पो मालवाहक, छोटा हत्ती या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

error: Content is protected !!