जिद्दीने प्रयत्न केल्यास अपयश येत नाही

मराठा समाजाच्या वतीने आयोजित गुण गौरव सोहळ्यात एस टी सावंत यांचे प्रतिपादन

दहावी बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. याच्यातून पुढील शिक्षणासाठी वेगळा मार्ग व वेगळी कृती प्राप्त होत असते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज हा मराठ्यांचा आहे. आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न होत आहे हे आनंदाची बाब आहे. परंतु या प्रगतीच्या युगात विद्यार्थी मागे पडू नये यासाठी त्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने आपली वाटचाल केली पाहिजे. आयुष्यात ध्येय साध्य करण्यासाठी जिद्दीने लढावे. जिद्दीने प्रयत्न केल्यास अपयश कधीही येत नाही असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत यांनी केले.
मराठा समाज प्राथमिक शिक्षका कणकवली च्या वतीने मराठा मंडळ सभागृहात विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी लावू वारंग, सुहास पाताडे, सुशील सावंत, ए.डी. राणे, सुहास सावंत, अमिता सावंत, अदिती मालपेकर, प्रशांत दळवी, दत्ता सावंत, गोविंद सावंत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या गुण गौरव सोहळ्यामध्ये मराठा समाजातील ९० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यामध्ये १० वी, १२ वी, ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच यावेळी सेवानिवृत्त व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना सुहास सावंत यांनी समाजातील विद्यार्थ्यांना नेहमी चांगले काम करत राहण्याची प्रेरणा मिळावी यासाठी मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्या वतीने गेली पंधरा ते सोळा वर्षे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम साजरा केला जात आहे. तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यपणे घेतले जातील असे सांगितले. यावेळी लवू वारंग, श्री. तर्फे, सौ. दळवी, सुशील सावंत, प्रा. अदिती मालपेकर श्री.पाताडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले तर आभार संतोष देसाई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमत राणे, सचिन सावंत, दिनेश सुद्रिक, सुशांत मर्गज, मंगेश खांबाळकर यांच्यासह आदी मराठा समाज प्राथमिक शिक्षकांनी मेहनत घेतली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!