बीएसएनएल टॉवर्स उभारणी निश्चित जागीच व्हावी

जागा बदल्यास गप्प बसणार नाही ; भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंचा बीएसएनएलच्या अधिकार्‍यांना इशारा ; महान गावासह मालवण तालुक्यातील टॉवर प्रश्नी राणे आक्रमक

सावंतवाडी :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात बी. एस. एन. एलच्या टॉवर्सची उभारणी सुरू आहे. मात्र मालवण तालुक्यात महान व अन्य गावात बीएसएनएलचा सर्वे झाला. ग्रामपंचयत व प्रशासन स्तरावर जागा निश्चित झाली. मात्र त्या ठिकाणी टॉवर उभारणी न करता खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक अन्य ठिकाणी टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न आहेत. नियमबाह्य पद्धतीने असे झाल्यास आम्ही गप्पं बसणार नाही. असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी बीएसएनएल अधिकार्यांना दिला.

सावंतवाडी येथील बी. एस. एन. एल मुख्य कार्यालयात त्यांनी धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बीएसएनएल निकषानुसार व मध्यवर्ती स्वरूपातील ज्या जागा मंजूर झाल्या त्याच जागी टॉवर्स झाले पाहिजेत. सोमवार पर्यंत सर्व दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. नियमात आहे तेच व्हावे ही आमची भूमिका आहे. आम्ही नियमाच्या बाहेर मागत नाही. विनायक राउत यांना हव म्हणून लोकेशन बदलणे हे चुकीचे आहे. विनायक राउत जेथे जेथे उद्घाटन करतात ते टॉवर्स चालू होत नाही. याचा अभ्यास करा. ते नियमाच्या बाहेर जाऊन टॉवर्सचा जागा बदलायला सांगत आहेत पण आम्ही नियमात आहे तेच सांगत आहोत त्यामुळे दिलेल्या जागेवरच टॉवर्स झाले पाहिजेत. असा आक्रमक पवित्रा निलेश राणे यांनी घेतला. यावेळी उपस्थित माजी सभापती सुधीर साळसकर व महान गावातील ग्रामस्थानीही भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करावे. अधिकारी वर्गाच्या कारभारामुळेच गावात वाद निर्माण होत आहे. निश्चित जागीच टॉवर उभारणी व्हावी. असे सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या टॉवरचे श्रेय खासदार राऊत व आमदार वैभव नाईक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकारी वर्गाने कुठल्याही दडपणाखाली येण्याची गरज नाही. थांबलेल्या टॉवर्सची कामे तत्काळ सुरु करा. असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस तथा कामगार नेते नेते अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी सभापती सुधीर साळसकर, आनंद शिरवलकर, महान उप सरपंच अजित राणे, बंटी पुरोहित, महान ग्रा प. सदस्य प्रसाद जाधव, दिलीप भालेकर, बांदा उपसरपंच जावेद खतिब, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, साईनाथ जामदार, गुरू मठकर, सागर शिंदे, अशोक जाधव, संग्राम साळसकर, मंगेश साळसकर, रवींद्र साळसकर, सुरेश घाडी, अजय तावडे, संतोष शिंदे, मदन घाडी, अनिल सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!