सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या वर्धापनदिन
आमदार प्रवीण दरेकर, जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा आपुलकीच्या सवेसह लाखो ग्राहकांना देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक दिवस स्पर्धेचा असूनही शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना,सवलतीच्या दरात कर्जे,शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आज महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे. ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारू बँक ४१ वर्षात पदार्पण करत आहे. बँकेचा ४०वा वर्धापन दिन शनिवार दिनांक १जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता शरद कृषी भवन, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होत असून या सोहळ्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आमदार मा.श्री.प्रवीण दरेकर,अध्यक्ष -मुंबई जिल्हा.म.सहकारी बँक लि. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील अध्यक्ष- रायगड जिल्हा म. सह. बँक लि., राजेंद्र पाटील अध्यक्ष- ठाणे जिल्हा म. सह.बँक लि. दिलीप दिघे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सह. बँक लि.मुंबई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर सोहळ्यास सहपरिवारा सह उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांनी केली आहे.
कणकवली प्रतिनिधी