प्रसाद कुलकर्णी यांची ‘आनंदयात्रा’ कणकवलीत

आतापर्यंत आनंदयात्रा चे 731 नाबाद कार्यक्रम
नागपूरपासून सिंगापूरपर्यंत आणि मुंबईपासून दुबईपर्यंत गाजत असलेला प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा धमाल एकपात्री कार्यक्रम येत्या शनिवारी कणकवलीत होणार आहे. श्रुतिसुखद कवितांची रिमझिम, पोट धरुन हसवणाऱ्या किश्श्यांचा पाऊस आणि त्या जोडीने आयुष्य जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असे स्वरूप असलेला हा कार्यक्रम सर्व थरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
निलायम द ब्ल्यू बॉक्स, हळवल येथे उद्या शनिवार, दिनांक १ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सादर होईल. हा या कार्यक्रमाचा ७३१ वा प्रयोग असून निलायमने जाहीर केलेल्या सभासद योजनचा शुभारंभ या प्रसन्न अशा कार्यक्रमाने होत आहे. कणकवली आणि परिसरातील रसिकांसाठी ही खास पर्वणी आहे. रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री वामन पंडित यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी




